आता पॅनसाठी अर्ज करणं खूप सोपं झालं असून, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर आहे, ते इन्स्टंट पॅन (instant Pan) किंवा ई-पॅनसाठी (E-Pan) ऑनलाइन अर्ज करू शकतात
यासाठी तुम्हाला प्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या आयकर पोर्टलवर जावं लागेल. या पोर्टलच्या होमपेजवर ‘Verify Your PAN’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तपशील विचारला जातो. यामध्ये तुम्हाला जन्मतारीख, मोबाइल क्रमांक आणि नाव भरावं लागेल. यासह पडताळणी प्रक्रिया सुरू होईल.
ई-पॅन (e-PAN) हे डिजिटल स्वाक्षरी केलेलं पॅन कार्ड असून, त्याचा ई-केवायसी (E-KYC) डेटा आधार कार्डावर आधारित आहे. ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे, तेच ई-पॅनसाठी अर्ज करू शकतात आणि मिळवू शकतात. ई-पॅन पीडीएफ (PDF) स्वरूपात जारी केलं जातं. पॅनची ही पद्धत वेळ वाचवणारी आहे. तसंच यात प्लास्टिक किंवा कागद वापरला जात नसल्यानं ती पर्यावरणपूरक आहे.
ई-पॅनसाठी अर्ज करण्याकरिता मोबाइल किंवा लॅपटॉपवरून खालील प्रकारे क्रिया करा :
- सर्वांत आधी कोणताही इंटरनेट ब्राउझर उघडावा आणि https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या पोर्टलवर जावं.
- या पोर्टलच्या होम पेजवर ई-पॅनसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावं.
- आता एका नवीन विंडोवर ‘Get New e-PAN’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावं.
- आता एक नवीन पेज उघडेल. यात तुम्हाला आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि जन्मतारीख ही माहिती भरण्यास सांगितलं जाईल. ही माहिती भरल्यानंतर याची पडताळणी करण्यासाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.
- यानंतर सबमिट टॅबवर क्लिक करावं.
- आपल्या ई-पॅनचं स्टेटस बघण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी, खाली सांगितलेल्या क्रिया कराव्यात.
- वेबसाइटच्या होमपेजवर जावं आणि ई-पॅनशी संबंधित टॅबवर क्लिक करावं.
- त्यानंतर एका नवीन विंडोवर ‘Check Status/ Download PAN’ चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- आता नवीन पेजवर तुम्हाला आधार क्रमांक भरण्यास सांगितलं जाईल. याची पडताळणी करण्यासाठी मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल, त्याद्वारे तुम्ही तुमच्या पॅनचं स्टेटस सहज तपासू शकाल.
- तुमचं ई-पॅन तयार असेल, तर तुम्ही हा दस्तऐवज डाउनलोड करू शकाल.
0 Comments
nice